महाबळेश्वरमध्ये शतकातील विक्रमी अतिवृष्टी (५१३ मि.मी.) (JULY 2026)
-
स्थान
महाबळेश्वर (जिल्हा - सातारा)
-
पर्जन्यमान नोंद
२४ तासांत तब्बल ५१३ मि.मी. (२० इंच) पावसाची विक्रमी नोंद झाली.
-
विक्रम
हा पाऊस महाबळेश्वरच्या इतिहासातील शतकातील विक्रमी पाऊस ठरला आहे.
भौगोलिक परिणाम व आपत्ती (Geographical & Disaster Impact)
-
वेण्णा नदी (Venna River) व पूल: वेण्णा नदीला पूर आला असून वेण्णा लेकजवळील लोखंडी पूल खचल्याने वाहने नदीपात्रात कोसळली.
-
नद्यांना पूर: सोळशी नदीला पूर आल्यामुळे येरणे खुर्द, येरणे बुद्रूक व आच्याली या गावांचा संपर्क तुटला.
-
घाटरस्ते व भूस्खलन (Landslides):
- पुणे-वाई-महाबळेश्वर आणि महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावर (जन्नी माता मंदिर परिसर/हारोशी) दरडी कोसळल्या व रस्ते खचले.
- घावरी-येरणे मार्ग खचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प.
-
पायाभूत सुविधांवर परिणाम: वीजपुरवठा खंडित झाल्याने जलपुरवठा योजना आणि मोबाईल/इंटरनेट सेवा कोलमडली.
भौगोलिक संदर्भ (Geographical Context)
-
महाबळेश्वरचे स्थान: सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) रांगेतील प्रमुख थंड हवेचे ठिकाण.
-
नद्यांचा उगम: महाबळेश्वर पठारावर कृष्णसह पाच नद्यांचा (कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री) उगम होतो.
-
पर्जन्याचे स्वरूप: प्रतिरोध पाऊस (Orographical Rainfall) – मान्सूनचे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वताला अडल्यामुळे या भागात सर्वाधिक पाऊस पडतो.
-
महाराष्ट्रचे चेरापुंजी: सर्वाधिक पर्जन्यमानामुळे महाबळेश्वरला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणूनही ओळखले जाते.